बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

पाटा खेळपट्टीमुळे धोनी-व्हिट्टोरी नाराज

मालिकेत बरोबरी करून अब्रू वाचविण्याचा प्रयत्नात असलेला न्यूझीलंडचा कर्णधार डेनियल व्हिट्टोरी आणि विजयश्री मिळवून न्यूझीलंडमध्ये इतिहास रजण्याच्या भारताच्या यांच्या अपेक्षांवर वेलिंग्टनच्या खेळपट्टीने पाणी फिरवले आहे. शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या तिस-या व शेवटच्या कसोटी मालिकेसाठी निर्जिव पाटा खेळपट्टी तयार करण्यात आल्याने दोघेही कर्णधार नाराज झाले असून त्यांनी आपली नाराजी जाहिररित्या व्यक्त केली आहे.

या मालिकेमध्ये भारताने 0- 1 अशी आघाडी घेतली असून मालिका जिंकून इतिहास घडविण्यासाठी हा सामाना महत्वाचा आहे तर सामाना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचे दडपण न्यूझीलंडवर असणार आहे. मात्र, वेलिंग्टनची खेळपट्टी पाटा असल्याचे निदर्शनास येताच दोन्ही संघ नाराज झाले. व्हिट्टोरी म्हणाला, मालिका बरोबरीत करण्यासाठी डाव घोषीत करण्याचा धोकादायक निर्णय घेण्‍याची तयारी आम्ही ठेवली आहे. काहीही करून आम्हाला ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची आहे पण, आमच्या अपे‍क्षेविपरीत खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. आम्ही न्यूझीलंडमध्ये आजपर्यंत अशी सुकलेली पाटा खेळपट्टी पाहिलेली नाही त्यामुळे वेलिंग्टनची खेळपट्टी पाहून धक्का बसल्याचे तो म्हणाला.

धोनीनेही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला, आम्हाला गवताळ खेळपट्टी अपेक्षित होती जेणेकरून आमच्या जलदगती गोलंदाजांना याचा फायदा मिळू शकेल पण, खेळपट्टी पाहून सारेच खेळाडू हैराण झाले आहेत. पण, आम्ही काहीही करून हा सामना जिंकणार, असा दावाही त्याने केला.