शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

इरफानला अखेर मिळाले घर

मुंबईसारख्या व्यावसायिक नगरीत बॉलीवूडमध्ये काम मिळविण्यासाठी पायाला चक्र लावून घ्यावे लागते. घरासाठीही तेच करावे लागते. इरफान खानही त्याला अपवाद नाही. इरफान गेल्या दोन वर्षांपासून मुंबईमध्ये घराच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वी तो मुंबईच्या मढ आयलंड परिसरात गेला. तेथे त्याला एका अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट पसंत पडले.

त्याने कुठलाच विलंब न करता ते फ्लॅट खरेदी केले आहेत. इरफानची पत्नी इंटिरियर डेकोरेटर असल्याने त्याने त्या दोन फ्लॅटचा एक केला असून नवरा- बायकोने मिळून घरासाठी नवीन डिझाइन केले आहे. सध्या इरफान 'बिल्लो बार्बर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.