गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सलमान - शाहरुख टक्कर टळली

IFMIFM
शाहरुख खानचा 'बिल्लू बार्बर' हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे हे शाहरुखलाही माहिती नाही. हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरुवातीस होती. पण, अजूनही चित्रपटाचे बरेचसे काम बाकी आहे. त्यामुळे दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणे शक्य नाही.

हा चित्रपटाला घेऊन शाहरुख कमालीचा उत्सुक आहे. 21 डिसेंबराला चित्रपट प्रदर्शित करण्याची त्याची योजना आहे. पण, याचवेळी त्याचा अलीकडचा कट्टर शत्रू सलमानचा 'युवराज' प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई आहेत.

खरे तर दोघा खानांचे चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होऊन टक्कर होऊ नये, अशी घईंची इच्छा आहे. याबाबतीत त्यांनी शाहरुखशी चर्चादेखील केली. घईंशी घनिष्ठ सबंध असल्याने शाहरुख राजी झाला.शाहरुखचा ' रबने बना दी जोडी' हा आणखी एक चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. एकाच महिन्यात आपले दोन चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत म्हणून शाहरुखनेही माघार घेतली. पण, या गोंधळात 'बिल्लू बार्बर' चित्रपट कधी प्रदर्शित करावचा असा प्रश्न सलमानला पडला आहेत. बहुतेक या चित्रपटासाठी पुढील वर्ष उजाडणार आहे.