शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: कराकस , शुक्रवार, 27 जून 2008 (12:00 IST)

अमेरिकी दूतावास उडवण्याची धमकी

व्हेनेझुएला येथील अमेरिकी दूतावास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिल्यानंतर दुतावासाच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.

दूतावासातील प्रवक्ते रॉबीन होल्जहाऊर यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञान व्यक्तीने फोन वरून ही धमकी दिली आहे. यानंतर दूतावासाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, बॉंबशोधक पथक या भागात तैनात करण्यात आले आहे.