गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वार्ता|
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2010 (16:52 IST)

मधुकरराव चौधरी कालवश

PR
विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचं रावेर तालुक्यातील खिरोदा येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. रावेर तालुक्यातील खिरोदा येथे त्यांच्या राहत्या घरी आज पहाटे ह्रदयविकाराने त्यांच्या मृत्यू झाला ते 83 वर्षांचे होते.

रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे ते वडील होते. ते स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं होतं. विश्व हिंदी परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी आठ विश्व हिंदी परिषदांचं आयोजनही केलं होतं. आतापर्यंत 23 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाले होते.