गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|

आयपीएलच्या निर्णयाचा हॉटेल उद्योगांना फटका

आयपीएल सामने देशाबाहेर घेण्यात येण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केल्याने देशातील हॉटेल उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे.

आयपीएल चे 59 सामने 12 शहरांमध्ये होणार होते. यासाठी हॉटेल उद्योगांनी जोरदार तयारी केली होती.

आता बीसीसीआयच्या निर्णयाने या हॉटेल उद्योगांचे मोठे नुकसान झाले असून, पर्यटन उद्योगासाठी ही शरमेची बाब असल्याचे मत एसोचेमच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष सुभाष गोयल यांनी व्यक्त केले आहे.