शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

काश्मिरात दोन दहशतवादी जेरबंद

काश्मीरमध्ये काल रात्री पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोकेरनाग भागातील गुरीद्रमण लारनू भागात पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली असता, या भागातून पोलिसांनी हिज्बुलच्या अब्दुल जब्बार लोन याला अटक केली.

त्याच्याकडून पोलिसांनी एक रायफल, 40 काडतुसं, चार मॅगझिन्स, एक वायरलेस सेट, आणि स्फोटकं जप्त केली आहेत.

दुसरीकडे बारामुल्ला भागातील खोजा बाग भागात अल बद्र च्या गुलाम मोहंम्मद वानी उर्फ गुलाला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडूनही पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र जप्त केली आहेत.