शनिवार, 13 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मे 2023 (16:15 IST)

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अखेर अरुंधती देणार प्रेमाची कबुली

Aai Kuthe Kay Karte : सध्या स्टार प्रवाह वर सोमवार ते शनिवार सायंकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारी मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay karate) वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. मधुराणी प्रभूलकर, मिलिंग गवळी, रुपाली भोसले आणि ओंकार गोवर्धन हे कलाकार आई कुठे काय करते या मालिकेत मुख्य भूमिका साकारतात आहे. या मालिकेत ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची घाई पाहायला मिळतात आहे. देशमुखांकडून आई आणि अप्पा हे केतकरांच्या घरी जाऊन दोघांच्या साखरपुड्याची तारीख  ठरवायला जाणार असून दोघांची पत्रिका जुळत आहे का हे देखील बघणार आहे.   
 
आता लवकरच ईशा आणि अनिशचा साखरपुडा लवकरच होणार आहे. 
'आई कुठे काय करते' या मालिकेत आशु आणि अरुंधती मधील दुरावा कमी होत  आहे. आशु अरुंधतीची काळजी घेतो तिला खूप जपतो.या मुळे आता अरुंधतीच्या आयुष्यात 'सुखाचे चांदणे 'बरसत आहे.   
 
'आई कुठे काय करते' मालिकेच्या येणाऱ्या भागात अरुंधती आशुतोषसमोर आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे.अरुंधतीने प्रेम व्यक्त केल्यामुळे आशुतोषला अति आनंद होणार आहे.या प्रेमाच्या कबुलीचा एक भाग स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. 
'आई कुठे काय करते' मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना अरुंधती आशुतोषवरील असलेल्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. आता ही मालिका रोमँटिक वळण घेताना दिसत आहे. पुढे काय होणार हे बघण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.  
 
Edited By - Priya Dixit