शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|

मॅकगेनच्या फिटनेसबाबत चिंता

येत्या 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी लेग स्पिनर ब्राइस मॅकगेनच्या प्रदर्शन आणि फिटनेसबाबत ऑस्ट्रेलियन संघ चिंताग्रस्त आहे.

खांद्याला सूज आल्यामुळे मॅकगेनने राजस्थान क्रिकेट अकादमीविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. परंतु, भारतीय क्रिकेट मंडळाच्या एकादशविरूद्ध गुरूवारी होणार्‍या सामन्यात तो खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

सामन्याचे चारही दिवस मला गोलंदाजी करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षाही त्याने यावेळी व्यक्त केली. भारताविरूद्ध मॅकगेन ऑस्ट्रेलियाचे मुख्य अस्त्र असणार आहे, म्हणून त्याच्या फिटनेसविषयी त्यांना चिंता सतावत आहे.