शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

दातांचा पिवळेपणा घालवा केवळ एका सोप्या उपायाने

येथे आम्ही आपल्याला चार उपाय सांगत आहोत ज्यातून एक जरी उपाया नियमाने केला तर दातांचा पिवळेपणा घालवता येईल.
 
मीठ आणि लिंबू
1 चमचा लिंबाच्या रसात दोन चमचे समुद्री मीठ मिसळून पेस्ट तयार करा. याने ब्रशच्या मदतीने दातांवर हलक्या हाताने घासा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरा. अशाने लिंबू दातांना नैसर्गिक रित्या ब्लीच करेल आणि पिवळी थर काढण्यात मदत करेल.
 
बेकिंग सोडा आणि लिंबू
1 चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात 2 चमचे लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट दातावर लावून 3 ते 4 मिनिट तसेच राहू द्या. नंतर पाण्याने गुळण्या करा. बेकिंग सोड्यात आढळणारे ब्लीचिंग गुण दातांना स्वच्छ करतील. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा करू शकता.
 
अॅप्पल साइडर व्हिनेगर
1 कप पाण्यात दोन चमचे अॅप्पल साइडर व्हिनेगर टाकून त्याने गुळण्या केल्याने दात पांढरे दिसू लागतात सोबतच तोंडातील दुर्गंध दूर होते.
 
ऑर्गेनिक कोकोनट ऑयल
ऑर्गेनिक कोकोनट ऑयलमध्ये लोरिक अॅसिड आढळतं. याने दातातील पिवळेपणा दूर होऊन दात मजबूत होतात. यासाठी तेलाचे काही थेंब दातावर लावून बोटाने मसाज करावी. नंतर 5 मिनिट असेच राहू द्यावे. नंतर गुळण्या कराव्या.
 
केळीच्या तुकड्याने करा मसाज
पोटॅशियमयुक्त केळ वापरल्याने दातांवरील पिवळेपणा आणि दुर्गंध दूर होते. याने दात मजबूत होतात. केळीचे तुकडे दातावर घासत 5 मिनिटांपर्यंत मसाज करावी. नंतर कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. याने दात स्वच्छ आणि चमकदार होतात.