गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By Author संदीपसिंह सिसोदिया|
Last Updated : मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:34 IST)

पृथ्वीला हिरवेगार बनविण्यासाठी निसर्गाची किमया

मानवी जीवन फुलांप्रमाणेच असते. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्या रोपट्याला फूल उमलते तेव्हा आपण सुद्धा फुलांप्रमाणे उमलतो. असे कोण असणार ज्याला मैदान आणि डोंगरावर पांघरलेल्या हिरव्यागार गवताचा सुवास आवडत नाही.? असे वाटते की निसर्गाने जणू धरणीचा शृंगारच केला आहे. पण ज्याप्रमाणे या धरणीच्या नैसर्गिक शृंगाराचा नायनाट होत चालला आहे त्याची झळ भावी तरुण पिढीला लागणार की नाही?     
 
विकासाच्या नावाखाली हिरवळ धोक्यात आली आहे. युएनइपी ने दिलेल्या अहवालानुसार विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या पृथ्वीवर विकासकामांमुळे हिरवीगार झाडं आता धोक्यात आली आहेत. 
 
युएनईपीच्या अहवालात असे म्हटले आहे की विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे 7.0 अब्ज हेक्टर' अरण्य होते आणि 1950 पर्यंत अरण्याचे क्षेत्र कमी होऊन 4.8 अब्ज झाले होते. आकडेवारी आता दर्शविते की अरण्ये आता कमी झाली आहे फक्त 2.35 अब्ज. आणि हे कटू सत्य आहे की दरवर्षी 7.3 दशलक्ष हेक्टर' उष्णकटिबंधीय अरण्ये कमी होत आहे. तर प्रति मिनिटाने 14 हेक्टर' अरण्ये संपत आहे.
 
तरी ही बऱ्याच शासकीय संस्था पुढाकार घेऊन आपापल्यापरीने निसर्गाचे रक्षण करण्यासाठी पुरजोर प्रयत्न करीत आहे. पण कधी कधी हे प्रयत्न पुरेसे पडत नाही. कधी गुंतवण्यासाठीची रक्कम, आणि लागणारे श्रम या दोन्ही गोष्टीत समतोलता राखण्याची इच्छा असल्यावरही परिस्थितीत काहीच बदल होत नाही.
 
दिवसांदिवस या वाढत्या परिस्थितीला बघत लोकांना झाडं कापू नका हे सांगण्याच्या ऐवजी झाडं लावा झाडं जगवा साठी प्रवृत्त करायला हवे. मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवणं करणे सहजच नसते. या साठी भक्कम भांडवलाची आणि वेळेची साथ पाहिजे. उदाहरणार्थ मध्यप्रदेशात गेल्या 5 वर्षात मध्यप्रदेश शासनाने वृक्षांच्या लागवडीसाठी 350 कोटी रुपये खर्च केले असून 40 कोटी वृक्षांची लागवणं केली असून निम्मे पण जगले नाही. खर्चाची बाब बघता वार्षिक लागत बघता सरासरीने 60 कोटीची आहे.
 
लोकांची साथ आणि आधुनिक, स्वस्त आणि यशस्वी तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळग्रस्त ठिकाणातही बदल होऊ शकतो. आधुनिकीकरणाच्या युगात निसर्गप्रेमींचे निसर्गाचे रक्षण आणि जतन करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असते. निसर्ग प्रेमी ह्या साठी उपाय योजतात. 
ह्या साठी सीड बॉलिंग आणि सीड बॉमिंग ही आधुनिक संकल्पना आहे. ही जपानची संकल्पना असून संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. पुरातनकाळात ही पद्धत इजिप्शियन वापरायचे पण जपानच्या एका शेतकरी मासानोबू फुकुओका याने जगभर ते प्रसिद्ध केले. ही पद्धत त्याने आपल्या शेतात पिकांचे जास्त उत्सर्जनासाठी राबवली. या सीड बॉलिंग किंवा सीड बॉमिंग पद्धतीचा वापर संपूर्ण जगभरातील देशांमध्ये वापरत आहे.  
 
सीड बॉल या सीड बॉम पद्धत म्हणजे काय ? 
बियाणे माती किंवा गोवऱ्याने 1/2 इंच ते 1 इंच च्या वर्तुळाकार गोळ्याप्रमाणे बनवून साठा केला जातो. त्याला सीड बॉल म्हटले जाते. अनेक देशांमध्ये कोळसा, नैसर्गिक खत आणि चिकणमातीचे गोळे वापरण्यात येतात. भारतातील बऱ्याच समुदायातील लोकं घनदाट अरण्य करण्यासाठी आणि वृक्षाची उत्तमरीत्या लागवणं करण्यासाठी या पद्धतीचा वापर करत आहे.  
 
सीडबॉल चा वापर नैसर्गिकरीत्या शेती करण्यासाठी आणि वाळवंट ठिकाणांना हिरवेगार करण्यासाठी वापरण्यात येतात. ही उत्तम खत आहे. या गोळीला सामान्य बियाण्यासारखेच पसरवले जाते. पावसातील पाण्याने नैसर्गिकरीत्या वाढते आणि अन्य रोपट्यांना पुरेशी पोषक द्रव्ये पुरवते. 
 
अश्या प्रकारे सीड बॉमिंग किंवा एरियल रिफॉरेस्टेशनतून पुनर्वनीकरण (Re-Forestation) एक अशी पद्धत आहे, यात विमानाने सीड बॉल्स अरण्यात किंवा वाळवंट्याचा ठिकाणी टाकले जातात. 
 
अश्या प्रकारचे अरण्याचे पुनर्वनीकरण झालेल्याची ची नोंद 1930 साली झाली होती. होनुलुलुच्या अरण्यात आग लागल्यामुळे त्याच्या डोंगऱ्याच्या पायथ्यांवर बियाणे टाकले गेले होते. त्यात यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण जगभरात ही पद्धत वापरण्यात येत आहे.
 
सध्याचा काळात अमेरिका, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड च्या दशलक्ष एकर हेक्टर अरण्यात या पद्धतीचे यशस्वीरीत्या प्रयोग केले गेले आहे. उत्तरी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात यशस्वी प्रयोगानंतर वैज्ञानिक विकासशील देशात ह्याचा वापर करत आहे.
     
भारतात पुरतन काळापासूनच वृक्षांना देव रूप मानून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. वृक्ष संपूर्ण देव रूप आहे अशी आख्यायिका आहे. प्राचीन ग्रंथात वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे.
 
मूले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखा शंकरमेव च
पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते ।।
 
वृक्षांच्या महत्तेबद्दल सांगितले आहे की वृक्षाचा मुळात ब्रह्म, सालीत विष्णू, फांद्यांत शंकर, आणि पानां-पानांवर सर्व देव असतात. चला मग आपण सर्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या धरणी मातेचे शृंगार करून तिला हिरवेगार पांघरूण घालण्याची प्रतिज्ञा घेऊ या. आणि आपल्या निसर्गाची आपल्या धरणीमातेची जोपासना करू या..ही प्रतिज्ञा निव्वळ सोशल मीडिया पूर्ती नसून जगभरातून आपल्या पृथ्वीवर दिसायला हवी.