शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2019 (12:36 IST)

ट्रकचा EMI भरण्यासाठी कांद्याची चोरी

बेंगळुरू- कांद्यांची किंमत वाढली म्हणून लोक कांदे जपून वापरत आहे तर त्यावर अनेक जोक्स देखील वाचायला मिळत आहे पण आता चक्क कांद्यांच्या चोरी झाली आहे. 
 
चोरांनी हिरियूरमध्ये कांद्याच्या ८१ गोणी उतरवल्या आणि शहरात नेण्यासाठी दुसऱ्या गाडीत भरल्या. हा कांदा तब्बल ४,७०० किलो ग्रॅम वजनाचा होता. चालक संतोष कुमार आणि चेतन यांनी जाणूनबुजून ट्रक ढकळला. मुख्य संशयित असलेला ट्रक मालक चेतन फरार आहे. पोलिसांप्रमाणे ट्रकचं कर्ज फेडण्यासाठी हे सर्व नाटक बसवण्यात आले आहे. 
 
कांदा व्यापारी शेख अली आणि त्याच्या दोन मुलांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे कांदा व्यापार्‍याची मदत करण्यासाठी तसेच ट्रक दुरुस्तीसाठी इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी हा असा प्लान बनवला गेला असावा.
 
बेंगळुरूतल्या तवारेकेरे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस पोलीसांना रस्त्याशेजारी उभा असलेला ट्रक बघून काही गडबड वाटली म्हणून चौकशी केली असता कळलं की ट्रकमध्ये भरलेल्या कांद्याच्या निम्म्या गोणी गायब आहेत.