गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट लेख
Written By
Last Updated : बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (15:41 IST)

जाणून घ्या पिंक बॉलबद्दल, काय आहे यात खास

1877 मध्ये लाल बॉलहून सुरु झालेला टेस्ट क्रिकेटचा प्रवास आता गुलाबी पर्यंत पोहचला आहे, प्रवास अजून सुरुच आहे. टीम इंडिया डे-नाइट टेस्टमध्ये प्रवेश करत आहे. ज्यात गुलाबी बॉल वापरली जाणार. भारतीय टीम पहिल्यांदा एका पिचवर पाच दिवस डे-नाइट क्रिकेट खेळणार आणि ती पिच असणार ईडन गार्डन्सची.
 
शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी कोलकातामधील इडन गार्डन्स स्टेडियमवर पहिल्यावहिल्या डे-नाईट टेस्टच्या निमित्ताने भारतीय क्रिकेटमधला नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
 
डे-नाइट टेस्टची सुरुवात 27 नोव्हेंबर 2015 साली झाली होती. एडेलेडच्या दुधाळ प्रकाशाखाली एकमेकांसमोर होते ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलँड. भारत-बांग्लादेश व्यतिरिक्त टेस्ट क्रिकेट खेळणारे सर्व प्रमुख देश डे-नाइट टेस्ट खेळून चुकले आहे. डे-नाइट टेस्ट बद्दल चर्चा असून सर्वात चर्चेत आहे ती पिंक बॉल. जाणून घ्या या बॉलबद्दल- 
 
पहिली पिंक बॉल
पहिली पिंक बॉलचे निर्माण ऑस्ट्रेलियाच्या बॉल मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी कूकाबूराने केले होते. कूकाबूराने अनेक वर्षांपर्यंत या नवीन पिंक बॉलचे परीक्षण केले तेव्हा एक योग्य गुलाबी चेंडू तयार झाला. पहिली पिंक बॉल तर 10 वर्षांपूर्वीच तयार झाली होती परंतू याची टेस्टिंग करण्यासाठी अजून पाच-सहा वर्ष लागले. अखेर 2015 मध्ये एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलॅड यांच्या खेळण्यात आलेल्या पहिल्या डे-नाइट टेस्टमध्ये पिंक बॉल वापरण्यात आली. नंतर प्रवास सुरु झाला.
 
गुलाबी रंग का ?
टेस्ट क्रिकेट पांढर्‍या रंगाच्या कपड्यांमध्ये खेळतात म्हणून यासाठी लाल रंगाचा चेंडू वापरला जात होता ज्याने बॉल स्पष्ट दिसून येतो. तसेच वन-डे रंगीन कपड्यात होत असल्यामुळे त्यात पांढरा बॉल वापरला जातो. आता  डे-नाइट टेस्टमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू का वापरतात हा प्रश्न प्रत्येकाला पडणे साहजिक आहे.
 
डे-नाईट टेस्ट काही वेळ सूर्यप्रकाशात आणि बराच वेळ कृत्रिम प्रकाशात खेळवली जाते. पांढरे कपडे आणि पांढरा बॉल असं होऊ शकत नाही. लाल बॉल कृत्रिम प्रकाशात दिसण्यात अडचण असते. यावर उपाय म्हणून ऑप्टिक यलो आणि नारिंगी रंगाच्या बॉलचा वापर करण्यात आला. मात्र या दोन रंगांच्या तुलनेत पिंक बॉलची दृश्यमानता अधिक आहे. गवतावर हा बॉल नीट दिसू शकतो तसंच कृत्रिम प्रकाशात बॅट्समनला हा बॉल सहजतेने दिसू शकतो.
 
16 प्रकाराच्या पिंक शेड्समधून निवड
एकदा गुलाबी रंगावर सहमती झाल्यावर सर्वात मोठे आव्हान होते कोणता शेड. यासाठी पिंकचे 16 शेड्स ट्राय केले गेले. प्रत्येक पिंक कलरचं परीक्षण केले गेले आणि त्यातील बदल बघायले मिळाले. अखेर एक आयडल शेडची निवड करण्यात आली.
 
रंग निश्चित झाल्यावर कंपनीसमोर समस्या होती की शिलाई कोणत्या रंगाच्या दोर्‍याने करावी. यासाठी अनेक प्रयोग केले गेले. कूकाबूरा कंपनीने पिंक बॉलची शिलाफ सर्वातआधी काळ्या रंगाच्या दोर्‍याने केली होती. नंतर हिरवा रंग वापरण्यात आला नंतर पांढरा. शेवटी हिरव्‍या रंगाच्या दोर्‍याच्या शिलाईवर सहमती झाली. परंतू टीम इंडिया ज्या कंपनीच्या पिंक बॉलने खेळणार आहे त्या दोर्‍याचा रंग काळा असेल.
 
निर्माण पद्धती
रेड आणि पिंक बॉलच्या निर्माण पद्धती विशेष अंतर नाही. प्रत्येक बॉल रबरने तयार होता केवळ डायचा रंग बदलतो आणि फॉरमॅटनुसार फिनिशिंग. बाउंस, हार्डनेस आणि परफॉर्मेंसच्या दृष्टीने दोन्ही बॉल एकसारखे आहे. टेस्ट मॅचमध्ये वापरला जाणारा लाल बॉल ग्रीसमध्ये ठेऊन मग वापरण्यासाठी सज्ज होतो. जेणेकरून पाणी बॉलमधल्या लेदरमध्ये शिरू नये. मात्र डे-नाईट टेस्टसाठी वापरण्यात येणारा पिंक बॉल ग्रिसमध्ये ठेवला जाऊ शकत नाही कारण तसं केलं तर पिंक बॉलची झळाळी निघून जाईल. पिंक बॉलवर गुलाबी रंगाचा अतिरिक्त मुलामा दिला जातो. जेणेकरून कृत्रिम प्रकाशात हा बॉल चमकेल. 
 
वेगवेगळ्या कंपनीच्या बॉलमधील अंतर
टेस्ट खेळणाऱ्या विविध देशांमध्ये तीन कंपन्या बॉल पुरवतात. भारतात होणाऱ्या टेस्ट मॅचेसवेळी एसजी कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स कंपनीच्या बॉलचा वापर केला जातो. अन्य टेस्ट खेळणाऱ्या देशांमध्ये कुकाबुरा कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. भारतातल्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी बीसीसीआयने एसजी कंपनीलाच पिंक बॉल तयार करण्याची जबाबदारी सोपवली. उत्तर प्रदेशातील मेरठस्थित एसजी कंपनीच्या फॅक्टरीत पिंक बॉलची निर्मिती झाली आहे. डे-नाईट टेस्टसाठी एसजी कंपनीने सहा डझन पिंक बॉल पुरवले आहेत.