शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (13:23 IST)

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले मनसेचे आभार

अजय देवगण लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर 'तानाजी: द अनसंग वॉरियर' च्या निमित्ताने घेऊन येत आहे. अलीकडेच चिुत्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठीतही डब होणार आहे. हा चित्रपट मराठीच नव्हे तर अन्य भाषांमध्येही प्रदर्शित व्हावा अशी इच्छा मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केली आहे. 
 
शिवरायांचे आठवावे रूप|
शिवरायांचा आठवावा प्रताप|
हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध आहेच परंतु 'तान्हाजी' हा सिनेमा जगभरातल्या भाषांत डब करून प्रदर्शित व्हावा. यानिमित्ताने आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निधड्या मावळ्यांचा पराक्रम जग पाहील. दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता अजय देवगण यांचे अभिनंदन. अशी पोस्ट खोपकर यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.  
 
यावर अभिनेता अजय देवगननं यासाठी अमेय खोपकर आणि मनसेचे आभार मानले आहेत.