शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: भुवनेश्‍वर , शुक्रवार, 17 ऑक्टोबर 2008 (10:58 IST)

लक्ष्‍मणानंदांच्‍या हत्‍येसाठी भाडोत्री माओवादी

विहिंपचे नेते लक्ष्‍मणानंद सरस्‍वती यांच्‍या हत्‍येसाठी त्‍यामागील सुत्रधारांनी माओवाद्यांची मदत घेतली असल्‍याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. विषेश म्‍हणजे त्‍यासाठी माओवाद्यांना दिलेले पैसे कंधमालच्‍या खेड्यांमधून देणगी स्‍वरूपात गोळा केला होता. या हल्‍ल्‍यामागील सुत्रधाराची ओळख पटल्‍याचेही पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

गुन्‍हा अन्‍वेषण विभागाचे मुख्‍य आयुक्‍त अरुण राय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की लक्ष्‍मणानंद यांच्‍या हत्‍येसाठी माओवाद्यांना पैसे देऊन एका समुदायाच्‍या तरुणांना त्‍यासाठीचे खास प्रशिक्षण दिले गेले होते. त्‍यांच्‍या हत्‍येची योजना डिसेंबर 2007 मध्‍ये झालेल्‍या कंधमालच्‍या जातीय हिंसाचारानंतर तयार करण्‍यात आली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. या हत्‍येसाठी माओवाद्यांना देण्‍यासाठीचे पैसे कंधमालमधील गावांमधून देणग्‍यांच्‍या स्‍वरूपात गोळा करण्‍यात आले असल्‍याची माहितीही राय यांनी दिली.