शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

बटाटा पोळी

साहित्य : 2 पोळ्या, 1 उकडलेला बटाटा, लाल तिखट, मीठ, जीरे-धने पावडर तेल.
कृती : बटाट्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, मीठ, भाजलेली जीरे धने पावडर घालावी. हे मिश्रण नीट मळून एकजीव करावे. तयार झालेले हे मिश्रण पोळीच्या अर्ध्या भागात करंजीप्रमाणे भरून उरलेल्या अर्ध्यापोळीने तो भाग बंद करावा. आता तव्यावर मंद आचेवर हे दोन्ही भाग ठेवावेत. बाजूने चमच्याने किंचित तेल घालावे. उलथपण्याने ही पोळी हळूवारपणे दाबत राहावी. दोन्ही बाजू लालसर झाल्याकी पोळ्या खाली काढाव्यात. पोळीचा वरचा भाग उलथण्याने उघडावा. एकदम वाफेचा लोट येईल. तो जाऊ द्यावा. पोळी थोडी निवली की परत वरचा भाग लावून फ्रँकीप्रमाणे खावे.