शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: ब्रिजटाउन , शनिवार, 28 फेब्रुवारी 2009 (18:47 IST)

बोपाराचे शानदार शतक...

इंग्लंडचे पारडे जड

रवी बोपाराचे पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळीमुळे इंग्लंडचे पारडे जड झाले आहे. वेस्ट इंडीज विरूध्द चौथ्या क्रिकेट कसोटीत फेरीत इंग्लंडने सहा गडी गमावून 600 धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. बोपाराने 104 धावाचे योगदान लाभले.

इंग्लंडने ठेवलेले लक्ष्य पार करण्याच्या प्रवासाला निघालेल्या वेस्ट इंडीजची सुरवात खराब राहीली. जेम्स एंडरसनने कर्णधार क्रिस गेलला (6) लवकरच तंबूत परत पाठवले. तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 85 धावा केल्या होत्या.

दुखापतग्रस्त एंड्रयू फ्लिंटॉफच्या जागेवर गेल्या आठवड्यात आलेल्या बोपाराने शुक्रवारी पाल कोलिंगवुड (96) व टिम एम्बरोज यांच्यासोबत शतकी भागिदारी केली. इंग्लंडची घोषणा झाली तेव्हा एम्बरोज 76 धावावर खेळत होता.

वेस्ट इंडीजकडून फिडेल एडवर्ड्सने 30 षटकात 151 धावा देऊन तीन गडी बाद केले. एंडरसनने पाचव्या षटकात गेलला सहावर बाद करून वेस्ट इंडीजची डोकेदुखी वाढवली.