गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

जागतिक आर्थिक संकट टळले नाही- आयएमएफ

जगातील प्रमुख बाजारांना आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसला असून, येणाऱ्या काळातही याचा धोका कायम असल्याचे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रबंध निदेशक डोमिनीक स्ट्रास कान यांनी व्यक्त केले आहे.

सोमवारी अमेरिकी बाजार कोसळल्याने याचा फटका भारतासह अनेक देशांना सहन करावा लागला. सध्या जगभरातच आर्थिक मंदीची लाट आली असून इतक्यात मंदीतून बाहेर पडणे अशक्य असल्याचे स्ट्रास कान म्हणाले.

2009 नंतर आर्थिक मंदीतून काही देश बाहेर पडतील परंतु तोपर्यंत या देशांना मोठा फटका बसेल असेही कान म्हणाले.