प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही- वरुण
लोकसभा निवडणूकीदरम्यान आपण कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य करणार नसल्याचे शपथपत्र भाजप नेते वरुण गांधी यांनी न्यायालयाला दिले आहे. वरुण यांच्यावर यू पी सरकारने रासुका लावला असून, आपल्यावर लावण्यात आलेला रासुका रद्द करुन आपल्याला निवडणूक लढण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. यानंतर मुख्य न्यायाधीश के जी बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वरुण यांना शपथपत्र देण्यास सांगितले होते. वरुण यांनी हे शपथपत्र काल न्यायालयात दाखल केले असून,आचारसंहितेचा भंग करणार नाही आणि प्रक्षोभक वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.