मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: लंडन , मंगळवार, 8 डिसेंबर 2009 (14:17 IST)

'मला ओबामांसोबत झोपायचंय'

मला अमेरिकेन राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्‍नी मिशेल ओबामा यांच्‍यासोबत झोपायचंय अशी इच्‍छा ब्रिटीश कॉमिडियन रसल ब्रँड याने व्‍यक्त केली असून त्‍यामुळे एक नवीन वाद उत्‍पन्न झाला आहे. ब्रँड याने अनेकदा अशा प्रकारचे सेक्स-जोक्स करून वाद ओढवून घेतले आहेत. आता त्याने आपल्‍या जोक्सचा टार्गेट अमेरिकन राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामांना केले आहे.

रसलने अमेरिकेचे प्रेसिडेंट बराक ओबामा आणि मिशेल यांच्‍यासोबत झोपण्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली आहे. रसल म्हणाला, मी नेहमीच विचार करीत असतो की अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष दाम्‍पत्याचे वैवाहिक जीवन बेडरूममध्‍ये कसे असेल ते पाहण्‍यासाठी एकट्या बराक यांच्‍यासोबत तर मी झोपू शकत नाही. अशा वेळी मिशेल यांनाही मध्‍ये घ्‍यावे लागेल.

रसल नेहमीच अशा प्रसिध्‍द व्‍यक्तींवर जोक करीत असतो. त्‍याच्‍या या सवयीमुळे तो अनेकदा अडचणीत आला आहे. आता या प्रकरणातून काय समोर येते ते पाहणे मजेशीर ठरणार आहे.