शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

पोळा सण... बैलाला पूजेचा मान देण्याचा दिवस

भारत कृषी प्राधान्य देश आहे आणि कृषीसाठी गुरांचे देखील आपले महत्त्व आहे. भारतात गुरांची देखील पूजा केली जाते आणि पोळा सण त्यापैकी एक आहे ज्या दिवशी गाय, बैलाची पूजा केली जाते. या दिवशी शेतकरी आणि इतर लोकं देखील गुरांची विशेष करुन बैलाची पूजा करतात, त्यांना सजवतात आणि पोळाला बैल पोळा असे देखील म्हटलं जातं.
 
पोळा अमावस्येच्या दिवशी येत असून याला पिठोरी अमावस्या म्हणून देखील साजरा करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केल जातो. बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसर्‍या दिवशी तान्हा पोळा म्हणून साजरा होता.
 
जेव्हा प्रभू विष्णू कृष्णाच्या रुपात धरतीवर आले तो दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो आणि तेव्हापासून कृष्णाचा मामा कंस त्याचे प्राण घेऊ बघत असताना कंसाने अनेकदा कृष्णाचा वध करण्यासाठी असुर पाठवले. एकदा कंसाने पोलासुर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध करुन सर्वांना हैराण केले होते तो दिवस अमावस्येचा होता. म्हणून या दिवसाला पोळा असे म्हणू लागले.
 
हा दिवस गुरांना त्यांच्या कामगिरीसाठी आभार म्हणून साजरा केला जातो. सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलाला पूजेचा मान देऊन नांगरापासून दूर ठेवले जाते. या दिवशी त्यांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतो. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं. त्यांच्या शिंगांना रंगवलं जातं. त्यांना फुलांची माळ घातली जाते. त्यांची ढोळ ताश्यासह मिरवणूक काढून त्यांना गोडाधोडाचं नैवेद्य दाखवलं जातं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरणपोळी, करंज्या, विविध भाज्या, बाजरा खिचडी अशा पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात. या दिवशी त्याच्याकडून कुठलेही काम घेत नाही. त्यांच्यासमोर नाच-गाणे करुन मनोरंजन केलं जातं.
 
लहान मुले मोठे बैल नेऊ शकत नाहीत. ते त्यांना आवरूपण शकत नाहीत. म्हणून त्यांच्या हौस-मजेसाठी तान्हा पोळा' साजरा करण्यात येतो. त्या दिवशी, लहान मुले लाकडापासून तयार केलेला बैल घेऊन खऱ्या बैलाप्रमाणेच या लाकडाच्या बैलाचा तान्हा पोळा साजरा करतात. 
 
या दिवशी मुलांचे कौतुक केलं जातं. त्यांना वाण दिलं जातं.