शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

विषारी दारू प्रकरणी दोघा पोलिसांना अटक

गुजरातमध्ये झालेल्या विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी आपल्याच दोघा सहकार्यांना अटक केली.विषारी दारू पुरवणाऱ्यांशी दोघा कॉन्स्टेबलचा संबंध उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणात 130 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यानंतर गुजरात पोलिसांनी अटक सत्र सुरू केले असून, यात अनेकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारने पोलिसांवरही कारवाईचे संकेत दिले होते.