शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

कर्नाकातही उ.भारतीयांना चोप

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन कर्नाटकातही उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. येथे रेल्‍वे भरती बोर्डाची परीक्षा देण्‍यासाठी आलेल्‍या उत्तर प्रदेश आणि बिहारच्‍या विद्यार्थ्‍यांना कर्नाटक रक्षा वैदीके (केआरव्‍ही) संघटनेने जोरदार चोप दिला आहे.

काही दिवसांपूर्वी कल्‍याण रेल्‍वे स्‍थानकावर परिक्षा देण्‍यासाठी आलेल्‍या उत्तर भारतीयांना मनसेच्‍या कार्यकर्त्यांनी चोप दिल्‍याची घटना ताजी असताना याच मुद्यावरून चीडलेल्‍या कर्नाटक रक्षा वैदीके संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांनीही उत्तर भारतीयांना झोडपले आहे.

तिकीट तपासनीस पदासाठी होणा-या या परीक्षेची जाहीरात स्‍थानिक वृत्तपत्रात न देता केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वृत्तपत्रात दिली गेल्‍याचा या संघटनेच्‍या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी केआरव्‍हीच्‍या 25 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.