मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

लालूंना आणखी एक झटका

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना आणखी एक झटका बसला असून, पक्षाच्या प्रवक्त्यांनंतर आता प्रदेश सरचिटणीस राम निहोरा यादव यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे.

हुजुरेगिरी करणाऱ्यांचा पक्ष असल्याचे जहाल टिका करत त्यांनी लालूंवरही आगपाखड केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच पक्षाचा निवडणूकीत पराभव झाल्याचे ते म्हणाले.

नितिश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमध्ये जाण्याचा निर्णय आपण तूर्तास तरी घेतला नसून, लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.