शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

महाराष्ट्राचा निवडणूक निकाल 22 पुर्वीच?

राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल 22 ऑक्टोबर ऐवजी त्‍यापेक्षा थोडा लवकर जाहीर होऊ शकेल असे संकेत मुख्‍य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी दिले आहेत. राज्यात 13 ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर 22 ऑक्टोबरला मतमोजणी करण्‍याचे यापूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मात्र या दोन दिवसांमध्‍ये नऊ दिवसांचे अंतर असून ते कमी करण्‍याचे प्रयत्न केले जात आहे.

हरियाणाच्या निवडणूक तयारीसाठी चंदिगडमध्ये आले असताना चावला म्हणाले, की मतदान आणि मतमोजणी यातील अंतर कमी करण्‍याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र संदर्भात निर्णय जाहीर करण्‍यापूर्वी राज्यातील विविध राजकीय पक्षांच्‍या नेत्यांची बैठक घेणार असल्याचे चावला यांनी जाहीर केले आहे.

चंदीगढ