गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

कॅबच्या विकास समिती अध्यक्षपदी सौरव गांगुली

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) ने माजी कर्णधार सौरव गांगुलीची क्रिकेट विकास समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

कॅबच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कॅबचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सौरवच्या नावाची घोषणा केली. विकास समितीकडे राज्याच्या क्रिकेट विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.