गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांचे आज उपोषण

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण करत आहेत. औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे आज लाक्षणिक उपोषण करत आहेत. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर हे नेतेही उपोषणात सहभागी होणार आहेत.
 
मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या योजनेची अंमलबजावणी करणे, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन, पिण्याचे पाणी या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे उपोषण करणार आहेत.
 
मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी लढा उभारणाऱ्या पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादला येण्याचं आवाहन भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. प्रीतम मुंडेंनी गेल्या आठवड्यात फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना साद घातली होती. त्यामुळे मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.