शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 16 डिसेंबर 2015 (10:38 IST)

पेट्रोलच्या दरात 50 पैशांची कपात

पेट्रोलच्या दरात केंद्र सरकारने प्रतिलिटर 50 पैशांची कपात केली असून डिझेलच्या दरामध्ये देखील 43 पैशांनी कपात मध्यरात्री पासून करण्यात येईल असे केंद्रीय पेट्रोलियम खात्याच्या सचिवांनी यासंबंधी बोलताना मंगळवारी सांगितले आहे. आता पेट्रोल नवी दिल्लीत प्रतिलिटर 59.58 रुपे आणि डिझेल 43 पैशांनी स्वस्त होऊन ते प्रतिलिटर आज 46.09 रुपयाला ग्राहकांना मध्यरात्रीपासून मिळेल असे त्याने सांगितले आहे ही दरवाढ कमी केल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल आणि महागाईदेखील काही प्रमाणात कमी होण्याला मदत होईल असे त्याने सांगितले आहे.