गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 23 मे 2009 (18:00 IST)

रिलायन्स कच्चे तेल खरेदी करणार नाही

रिलायन्स इंडस्ट्रीज व एस्सार ऑईल ईओएलकडून केर्न इंडिया राजस्थान कडून कच्चे तेल खरेदी न करण्याची शक्यता आहे. कारण कंपनी राजस्थानमधील तेल रिफायनरी काही आठवड्यातच सुरू करण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाचे दर त्याच्या निर्धारीत मूल्यापेक्षा अधिक ठेवण्यात आले असल्याचे रिलायन्स व एस्सारच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. केर्नने इंडियन ऑईल कार्पोरेशनशी मूल्य करार केला आहे. कंपनीने इंडियन ऑईलला नाइजीरियायी बोनी लाइट क्रूडच्या तुलनेत डिस्काउंटवर तेल विकण्यासंदर्भात करार केला आहे. केर्न आयओसीला 2009-10 मध्ये 19 लाख टन तेल विक्री करणार आहे.