शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑगस्ट 2018 (15:57 IST)

यंदा ‘ओणम’चे सेलिब्रेशन नाही

केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता अनेकांनीच मदतीचे हात पुढे करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सद्यस्थिती पाहता आणि झालेल्या नुकसानाचा अंदाज घेता ‘ओणम’ साजरा न करण्याचा निर्णय बऱ्याच मल्याळी समाज संघटनांनी घेतला आहे.
 
देशात विविध ठिकाणी असणाऱ्या मल्याळी समुदायाच्या लोकांनी एकमताने हा निर्णय घेतल्याचं कळत आहे. केरळमध्येही हा सण साजरा केला जाणार नसल्याचं कळत आहेत. कापणीच्या हंगामाकडे लक्ष वेधणारा आणि पावसाळा संपण्याकडे इशारा करणाऱ्या या सणाच्या वेळी निसर्गाच्या विविध रंगांची उधळण झाल्याचं पाहायला मिळतं. पण, याच निसर्गाचा कोप झाल्यामुळे ओढवलेली ही आपत्ती पाहता यंदा ओणमचा उत्साह पाहायला मिळणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे.