शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: कोलंबो , शनिवार, 26 जुलै 2008 (18:00 IST)

भारताचा तिसरा मोठा पराभव

श्रीलंकेविरूद्ध भारताने एक डाव आणि २३९ धावांनी स्वीकारलेला पराभव म्हणजे एक नवीन विक्रम आहे. हा भारताचा तिसरा मोठा पराभव आहे, तर त्याचवेळी श्रीलंकेचा हा तिसरा मोठा विजय आहे.

यापूर्वी भारताला १९५८ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध कोलकतामध्ये झालेल्या कसोटीत एक डाव आणि ३३६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर १९७४ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्डसच्या मैदानावर एक डाव आणि २८५ धावांनी पराभवाचे तोंड पहावे लागले होते. त्यानंतर आज झालेला पराभव तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पराभव आहे.

त्याचवेळी श्रीलंकेने भारताविरूद्धचा सर्वांत मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी ऑगस्ट २००१ मध्ये श्रीलंकेने याच मैदानावर एक डाव आणि ७७ धावांनी पराभूत केले होते.

याशिवाय श्रीलंकेने झिम्बाब्वेला बुलावायोमध्ये एक डाव आणि २५४ धावांनी हरविले होते. हा सर्वांत मोठा विजय आहे. याशिवाय झिम्बाब्वेलाच २००४ मध्ये एक डाव आणि २४० धावांनी पराभूत केले होते.