बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

राज ठाकरेंविरोधात भोजपुरी वेबसाईटची मोहिम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात एका भोजपुरी वेबसाईटने मोहिम उघडली आहे.

भोजपुरीया डॉट कॉम असे या वेबसाईटचे नाव आहे. राज ठाकरे यांच्याविरोधात हिंसक आंदोलन करण्यापेक्षा त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त प्रमाणात गु्न्हे दाखल करण्यात यावे असे आवाहन या वेबसाईटतर्फे उत्तर प्रदेश, बिहार व झारखंडच्या लोकांना करण्यात आले आहे.

उत्तर भारतीयांविरोधात फुटीरतावादाचे बीज रोवणार्‍या राज ठाकरेंविरोधात एवढे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, की त्यांची रात्रीची झोप उडायला हवी, असे या वेबसाईटने म्हटले आहे. त्यासाठीच वेबसाईटतर्फे लोकांना एसएमएस पाठविण्यात येत आहेत. त्यात प्रत्येक व्यक्तीने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयात राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा असे आवाहन करण्यात येत आहे. या खटल्यांमध्ये अडकून राज न्यायालयीन चक्रात अडकायला हवे. त्यामुळे देश तोडण्याचे काम करण्याची हिंमतही ते करू शकणार नाहीत, असे या वेबसाईटचे प्रमुख सुधीरकुमार यांनी सांगितले.