मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 15 डिसेंबर 2016 (17:46 IST)

इ-सेन्सने विश्व अपंग दिवस पाळला

प्रधान सुविधा: मतिमंद मुलांसाठी इ-लर्निंग द्वारा शिक्षण  

इ-सेन्स यांनी रायगड जिल्हातील पेण येथे ’मानसिक व शारीरिक रीत्या अपंग असलेल्या मुलांसाठी सुमंगल शाळा, एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचे’ संचालन करणार्‍या सुहितजीवन संस्थे द्वारे आज मतिमंद मुलांसाठी इ-लर्निंगची सुविधा देऊन जागतिक अपंग दिवस पाळला.    

"इ-लर्निंग साधनांच्या साह्याने विशेष मुलं शिकण्यास, ज्ञान संपादन करण्यास सक्षम होतील आणि त्यांच्या वास्तविक जीवनात आकलनविषयक, संवाद, सामाजिक तसेच सर्वसामान्य कौशल्य सारख्या बाबी व्यापक करू शकतील. दृक-श्राव्य साधनांच्या माध्यमातून ते खूप आवडीने शिकतील. या मुलांसाठी शिकविण्याची-शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व प्रबळ ठरेल." असे इ-सेन्स लर्निंग प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमित गाला यांनी सांगितले.   

पालक प्रेरणा व जागरूकता या विषयावर शाळेत एका परिसंवादात बोलताना, श्री. अमित गाला म्हणाले, "तुम्ही मला माझ्या शाळेतल्या दिवसांची आठवण करून दिली म्हणून मी तुमच्यासोबत असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. शिवाय, मला प्रमुख पाहुणे म्हणून जो सन्मान दिला त्याबद्दल मी सुहितजीवन संस्थेचा आभार व्यक्त करतो. सुहितजीवन संस्थेच्या डॉ. सुरेखा पाटील यांनी मला इ-लर्निंगची उपकरणे दान करण्याची, या सत्कार्यात सहभागी होण्याची व या विशेष मुलांच्या चेहर्‍यांवर स्मित आणण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार व्यक्त करतो."   

सुहितजीवन संस्थेविषयी.
सुहितजीवन ही एक सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आहे जिची सुरवात 2004 मध्ये रायगड जिल्यातील पेण तालुक्यात करण्यात आली. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातल्या मानसिक व शारीरिकरीत्या अपंग असलेल्या मुलांमधल्या व प्रौढांमधल्या अज्ञात प्रतिभेला उजागर करण्याच्या ध्येयासह ही संस्था आर्थिकरीत्या वंचित लोकांना त्यांच्या आवडत्या विषयांमध्ये योग्य शिक्षण व प्रशिक्षण मिळावे यासाठी मदत करते. अशा वंचित मुलांना आत्म-निर्भर करण्याचा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेने राज्य शासनमान्य ’मानसिक व शारीरिकरीत्या अपंग असलेल्या मुलांसाठी सुमंगल शाळा, एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे. या संस्थेने भारतीय पुनर्वसन परिषद, नवी दिल्ली मान्यताप्राप्त लाइट हाऊस स्पेशियल टीचर्स ट्रेनिंग सेन्टर देखील सुरू केले आहे. सध्या ही शाळा 100 हून जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.      

इ-सेन्स विषयी.
इ-सेन्स ही एक झपाट्याने विकसित होणारी डिजिटल शिक्षण कंपनी आहे जीचे लक्ष्य भारतातील शाळांना व विद्यार्थ्यांना इ-लर्निंगचे उपाय देण्याचे आहे. इ-सेन्स कंपनी शिकण्याच्या प्रक्रियेला नाविन्यपूर्ण प्रकारे तयार करून तिला प्रभावी करण्याचा अचूक प्रयत्न करते. इ-सेन्स येथील कर्मचारी शिक्षणाला व शिक्षण अनुभवाला समृद्ध करणार्‍या उपायांची कुशलतेने आखणी करतात. ’खडू व चर्चा’ पद्धतीच्या पलिकडे जाण्यावर आणि शिक्षणाच्या वातावरणाला उत्तेजित करण्यावर येथे भर दिला जातो. तंत्रज्ञानाला शिक्षणासोबत समाकलित करण्याचे त्यांचे लक्ष आहे.