शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By नई दुनिया|
Last Modified: न्यूयॉर्क , बुधवार, 13 फेब्रुवारी 2008 (11:23 IST)

मारेकर्‍यांचे नंबर बेनझीरकडे होते..!

आठ वर्षांच्या कालावधीनंतर पाकिस्तानात परतलेल्या पाकच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना त्यांच्या मारेकर्‍यांचे मोबाईल नंबर मिळाले होते. हा खुलासा झाल्याने त्यांच्या हत्ये विषयीचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे.

आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 'रिकंसीलेशन इस्लाम, डेमोक्रॅसी ऍड द वेस्ट' आपल्या या पुस्तकात बेनझीर यांनी याचा खुलासा केला आहे.

त्यांना हे नंबर मिळताच त्यांनी राष्ट्रपती परवेझ मुर्शरफ यांना यासंबंधीची माहिती दिली होती असा खुलासाही या पुस्तकात करण्यात आला आहे.