गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (19:45 IST)

अमेरिकेने हल्याबाबत पुनर्विचार करावा: पाक

अमेरिकने पाकिस्तानची चिंता आणि भावनांचा सन्मान करुन आपली ‍सीमा पार करु नये. तसेच हवाई हल्याबाबत पुनर्विचार करावा, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले आहे.

अमेरिकन विमानांकडून दहशतवाद्यांचे वर्चस्व असणार्‍या पाकच्या दक्षिणत्तर सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले जात आहे. त्याबाबत सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत श्री.कुरेशी यांनी म्हटले आहे की, जर हवाई हल्यामुळे फायदा ऐवजी नुकसान होत असेल तर त्याबाबत पुनर्विचार केला जावा. तसेच या हल्यांमध्ये सामन्य नागरीक ठार होत असल्याने पाकमधील जनतेत नाराजी पसरली आहे.