मंगळवार, 19 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|

ऑस्ट्रेलियाच्या संघात जॉनसनचा समावेश

दक्षिण ‍अफ्रिकेविरुध्द होणार्‍या पुढील दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज मिशेल जॉनसन याला ऑस्ट्रेलियाच्या संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे.

पहिल्या दोन सामन्यात संघात असलेल्या रेयान हैरिस याला वगळून जॉनसनला स्थान देण्यात आले आहे. तसेच आक्रमक फलंदाज डेव्हिड वार्नर यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात वार्नर अपयशी ठरला होता, तरी त्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.