शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑक्टोबर 2018 (09:02 IST)

शरद पवार यांचा नातू लढवणार निवडणूक

राज्यातील सर्वात प्रभवाशाली असलेले राजकीय घरे  ठाकरे घराण्यापाठोपाठ आता पवार कुटुंबीयांची पुढची पिढी राजकारणात सक्रिय होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार याचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढवणार आहे. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. पार्थ पवार अनेक दिवसांपासून शरद पवारांसोबत राजकीय कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची ६ आणि ७ ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक आहे. या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांचे आणि प्रदेशाध्यक्षांशी बोलून याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाईल. मात्र अजूनही कोणत्याही नेत्याने याला दुजोरा किंवा नकारही दिलेला नाही.