शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 14 डिसेंबर 2019 (14:52 IST)

'एचएस कोड' म्हणजे काय?

खादी या कापडाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. खादीचे कुर्ते, साड्या, ड्रेस, शर्ट मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. खादी म्हणजे भारताची शान. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या खादीला 'एचएस कोड' दिला आहे. एचएस कोड म्हणजे नेमकं काय? 
 
एचएस कोड म्हणजे 'हॉर्मोनाइज्ड सिस्टीम कोड'. हा आंतरराष्ट्रीय कोड आहे. खादीची मागणी, विक्री, खरेदी, निर्मिती आणि प्रसिद्धी वाढवण्यासाठी तसंच जगभरात नवी ओळख निर्माण करण्यासाठी सरकारने हा कोड दिला आहे. एचएस कोड म्हणजे सहा आकडी क्रमांक. 'वर्ल्ड कस्टम ऑर्गनायजेशन' म्हणजे डब्ल्यूसीओकडून अशा प्रकारच्या कोडची निर्मिती केली जाते. उत्पादनाला परदेशात किती मागणी आहे, उत्पादनाचा किती वापर होतो हे एचएस कोडमुळे कळू शकतं. आज 200 पेक्षा जास्त देश आंतरराष्ट्रीय व्यापारसाठी तसंच जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी या डाटाचा वापर करतात. सरकारी आणि खासगी कंपन्या तसंच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून एचएस कोडचा वापर केला जातो.

वैष्णवी कुलकर्णी