मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

पंढरीत दलित महिलेवर बलात्कार

WD
येथील एका विकलांग विधवा महिलेवर साठ वर्षीय मुक्तार बेद्रेकर या व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी दुपारच्या दरम्यान जुन्या कराड नाक्याजवळील बेद्रेकर वाडय़ात घडली. सदर महिला दलित असल्यामुळे दलित संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढत अपराधी व्यक्तीस फाशीची मागणी केली. या वेळी संतप्त जमावाने दगडफेक केल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच यावर नियंत्रण ठेवले.

जुन कराड नाक्याजवळ आरोपी मुक्तार महंमदअली बेद्रेकर याचे मटण विक्रीचे दुकान आहे. तिथे जवळच त्याचे असून त्याच्या घरातील एका भागात सदर विकलांग विधवा महिला तिच्या दोन मुलांसह राहते. आजारी असल्मयामुळे ही महिला झोपून असते. गुरुवारी आरोपी बेद्रेकर याने त्या महिलेची मुले घरात नाहीत हे पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती पीडित महिलेने मुले आल्यानंतर त्यांना सांगितली. या नंतर गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता बेद्रेकर याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागी पोलीस अधिकारी प्रशांत कदम व शहर पोलीस निरीक्षक बाळासाहेब रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशी करून आरोपीस अटक केली. पीडित महिला दलित असल्यामुळे बेद्रेकर याच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.