शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

मुंबई संघात तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू

एक ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या इराणी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबईच्या रणजी संघाची जबाबदारी वसीम जाफर याला देण्यात आली आहे. जाफरच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघात तीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचाही समावेश आहे.

रोहित शर्मा, आजीत आगरकर, आणि रोमेश पवार या तिघांच्या समावेशाने मुंबईचा संघ आणखी दमदार झाला आहे.

एक तारखेला शेष भारताविरोधात मुंबईचा सामना होणार आहे. विरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखालील या संघात इरफान पठाण, मुनाफ पटेल, आणि प्रज्ञान ओझा यांचा समावेश आहे.