गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (17:48 IST)

अँजेलिनाला मागे टाकत कॅटरिना ठरली टॉप

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि गायिका बेयोन्से यांना मागे टाकत सेक्सिएस्ट वुमनचा खिताब आपल्या नावे केला आहे. नॅशनल डेलीच्यावतीने आयोजित एका यूथ सव्र्हेमध्ये कॅटरिना कैफला 37 टक्के लोकांनी सेक्सी म्हणून संबोधित केले आहे.

कॅटरिना कैफच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट कदाचित आश्चर्याचा धक्का देणारी नसावी, कारण अलीकडेच एका प्रसिद्ध मासिकानेदेखील कॅटरिनाला भारतातील सर्वात सुंदर महिलेचा खिताब दिला होता. इतकेच नाही तर सेक्सिएस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड म्हणून देखील कॅटरिनाची निवड करण्यात आली होती.

उल्लेखनीय म्हणजे एकामागून एक एवढे खिताब मिळवणारी कॅटरिना बॉलिवूडची पहिली अभिनेत्री ठरली आहे. ट्रस्ट रिसर्च अँडव्हाइजरीच्या एका सव्र्हेत भारतातील मोस्ट अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीच्या यादीत शाहरुख खान, अमिताभ बच्चन, महेंद्रसिंग धोनी आणि आमिर खान यांच्यानंतर कॅटरिना कैफला सहाव्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे.

वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्याफेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.