शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 30 जुलै 2014 (12:26 IST)

करा उच्च रक्तदाबावर मात

वस्तूंनाही आयुष्य असतंप्रत्येक वस्तूचा वापर काही ठरावीक काळासाठी योग्य ठरतो. त्या काळानंतर वस्तू वापरण्यासाठी अयोग्य ठरते. मात्र बरेच जण याविषयी निष्काळजीपणा दाखवतात. अर्थातच याचे दुष्परिणामही भोगावे लागतात.
 
उशी : प्रत्येकाला आपल्या नेहमीच्या उशीवर डोकं टेकवल्यावरच शांत झोप लागते. मात्र या उशीचं आयुष्यही र्मयादित आहे. तज्ज्ञांच्या मते दरवर्षी उशी बदलायला हवी. कारण डोक्याच्या त्वचेतून सुटणारे तेल, त्वचेचे बारीक कण यामुळे जंतुसंसर्गास आमंत्रण मिळत असते. यामुळे उशीतला कापूस खराब होतो. दीर्घकाळ उशी वापरल्याने आकार बदलतो आणि मान अथवा डोकेदुखी सुरू होते.
 
गादी : तज्ज्ञांच्या मते गादी कितीही चांगल्या दर्जाची असली तरी ७ वर्षांपेक्षा जास्त वापरू नये. एकच गादी वापरत राहिल्यास कंबरदुखी अथवा पाठदुखी उद्भवते.
 
वॉटर फिल्टर : बरेच जण एकदा वॉटर फिल्टर लावून घेतला की त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र ठरावीक काळानंतर त्यातील फिल्टर बदलायला हवेत. अन्यथा आरोग्यास हानी संभवते. बदलत्या जीवनशैलीमध्ये हृदयविकार, मधुमेह अथवा उच्च रक्तदाब असे विकार आपल्या सरावाचे झाले आहेत. आपण त्याबरोबर जगायला शिकतो आहोत. मात्र याच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आहारामध्ये काही बदल करायला हवेत. 
 
उच्च रक्तदाब असेल तर काही पथ्यं पाळावीत. अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस आणि अर्धा कप पाणी एकत्र करून दिवसातून तीन वेळा प्यायल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. 
 
रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास लिंबूपाणी घ्या. 
 
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जेवणात मठ्ठा घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
 
काही दिवस पाच तुळशीची पानं आणि पाच कडुनिंबाची पानं चावून खाल्ल्यानं उच्च रक्तदाब सामान्य होतो. 
 
अनशापोटी लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रणात येतो. 
 
चमचाभर कांद्याच्या रसात मध मिसळून घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात येतो.