शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: जम्मू , गुरूवार, 4 सप्टेंबर 2014 (17:42 IST)

वैष्णोदेवीच्या चरणी नकली सोने-चांदी!

देशातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेली माता वैष्णोदेवी मंदिराला नकली सोने-चांदी दान केल्याचे आढळून आले आहे. वैष्णोदेवीला आलेल्या दानात तब्बल 43 किलो सोने आणि 57 हजार किलो चांदी नकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
वैष्णोदेवी मंदिरात गेल्या पाच वर्षांदरम्यान दान केल्या गेलेल्या 193.5 किलो सोने आणि 81,635 किलो चांदीबाबत आरटीआय अंतर्गत माहिती मागवण्यात आली होती. त्यात ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.  
 
वैष्णोदेवी व्यवस्थापन बोर्डाचे मुख्य कार्यकारी एम. के. भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैंकी तब्बल 43 किलो सोने आणि 57,815 किलो चांदी नकली असलेली आढळून आली. दानात आलेल्या किंमती धातुंचे नाणे बनविण्यासाठी सरकारकडे पाठवले होते. सोने चांदीची नाणे भक्तांना प्रसादात दिले जातात. एक आठवण म्हणून त्यांच्याकडे ही नाणे दिली जातात.