बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

रुग्णालयात लागली पिझ्झाची रांग

WD
दोन वर्षाच्या हेजल नावाच्या या मुलीला नूरोब्लाज्मा नावाचा आजार आहे. अपवादानेच होणारा हा कर्करोग नवजात अर्भक आणि लहान मुलांमध्ये आढळून येतो. या आजाराशी झुंज देणार्‍या हेजलवर लॉस एंजलिसमधील रुग्णालयात 18 महिन्यांपासून उपचार सुरू आहेत. रुग्णालयात हेजलने नुकताच पिझ्झा खाण्याचा हट्ट धरला होता. कुटुंबीयांच्या मदतीने रुग्णालयातील तिच्या खोलील्या खिडकीवर ‘मला पिझ्झा खायचा आहे’ असा संदेश लावला.

रुग्णालयातील एका रेडिट वापरकर्त्याने या संदेशाचा फोटो रेडिटवर अपलोड केला. काही वेळातच त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र त्यानंरचे परिणाम आणखी आश्चर्यकारक होते. रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर एकानंतर एक पिझ्झाची रांगच लागली. एकाच दिवसात रुग्णालयात एवढे पिझ्झा पोहोचले की, या मुलीला पिझ्झा तर मिळाला, पण संपूर्ण कर्करोग विभागातील कर्मचार्‍यांनीही पिझ्झा पार्टी केली. त्यानंतरही पिझ्झा येणे बंद झाले नाही. मात्र रुग्णालय व्यवस्थापनाने लोकांचे आभार मानत पिझ्झा न पाठवण्याची विनंती केली.