शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान घेण्यात येणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
 
येत्या 18 फेब्रुवारी 2020 पासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होईल. तर 3 मार्च 2020 पासून दहावीच्या परीक्षांना सुरुवात होईल. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय शिक्षण मंडळांतर्गत या परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार  आहे.
 
दहावी बारावीच्या सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आज (15 ऑक्टोबर) पासून वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.