बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2015 (10:21 IST)

मुख्यमंत्र्यांनी केली 10, 512 कोटींची घोषणा

नागपूर- महाराष्ट्रावर दुष्काळी भीषण संकटात सरकार विरोधकांनी सहकार्यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आज शेतकरी कर्जमाफीला स्पष्ट शब्दात नकार दिला. एका नव्या पॅकेजची घोषणा केली. कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्या रोखण्याचा पर्याय नसून खात्रीशीर पाणी, वीज देणे, शेतीवरील गुंतवणूक वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.

विरोधकांनी केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी 10 हजार 512 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा विधानसभेत केली.