शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (11:19 IST)

भाजप कार्यकर्त्याकडून 50 लाख जप्त

अहमदाबाद येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याकडून निवडणूक आयोगाच्या एका पथकाने 50 लाख रुपये सोमवारी जप्त केले. अहमदाबाद जिल्ह्यामध्ये हा कार्यकर्ता आपल्या चारचाकी गाडीमधून प्रवास करत असताना या पथकाने त्यांच्याकडून रोकड हस्तगत केली. या प्रकाराची माहिती प्राप्तिकर विभागास देण्यात आली आहे. याचबरोबर या कार्यकर्त्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यकर्त्याच्या गाडीमध्ये एकूण एक कोटी रुपये आढळले होते. मात्र, त्यापैकी 50 लाख रुपये हे बॅंकेमधून काढण्यात आले होते व त्याच्याकडे याची पावतीही होती. यामुळे केवळ 50 लाख रुपयेच जप्त करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.