गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: कोलकाता , गुरूवार, 25 मार्च 2010 (15:50 IST)

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर 350 कोटी खर्च- गिल

राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून, यावर आतापर्यंत 350 कोटीचा खर्च करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री एम एस गिल यांनी दिली आहे.

या खेळांसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असून, अचूक सुरक्षा व्यवस्थेसाठी दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत.

भारतात दाखल होणाऱ्या विदेशी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज असून, सुरक्षिततेबाबत सतर्कता बाळगली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.