गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

राजकारणंना मूर्ख म्हटलेच नाही

WD
राजकारण्यांविरुध्द जहाल भाषा वापरल्यानंतर भारतरत्न पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ प्रोफेसर सी.एन.आर. राव यांनी अवघ्या चोवीस तासात सारवासारव केली आहे. राजकारणंना मूर्ख म्हटलेच नाही, असे आता राव यांनी म्हटले आहे.

विज्ञान संशोधनासाठी अपुरा निधी मिळतो एवढेच आपल्याला सांगायचे होते, असेही राव यांनी सांगितले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जयपाल रेड्डी यांनी राव यांच्या मताशी सहमती दर्शविली. विज्ञान संशोधनासाठी उपलब्ध होणारा निधी अपुरा असल्याचे रेड्डी यांनी मान्य केले होते. आपण ‘अँग्रीमॅन’ नसल्याचे सांगत राव म्हणाले की, राजकारणी व्यक्तींना प्राधान्य कशाला द्यायचे हे कळत नाही. आपण ‘तो’ शब्द पुन्हा वापरणार नाही.

शास्त्रज्ञांनी केलेल्या मागणीचा विचार करता 20 ते 30 टक्के निधी उपलब्ध होतो. ब्रिटिश संसदेत हा शब्द अनेकवेळा वापरण्यात येतो, असेही राव यांनी सांगितले. जयपाल रेड्डी यांनी सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे महत्त्व फार मोठे आहे. सरकारकडून मिळत असलेला निधी पुरेसा नसल्याचेही रेड्डी यांनी नवी दिल्लीत मान्य केले.