शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 डिसेंबर 2008 (12:12 IST)

देशात कार आणि दूचाकींच्या विक्रीत घट

देशात नोव्हेंबर महिन्यात स्थानिक कारच्या विक्रीत १९.३८ टक्क्यांची घसरण होऊन मागिल वर्षात याच कालावधीत झालेल्या १,०३,०३१ संख्येवरून ८३,०५९ पर्यंत विक्रीत घट झाली आहे.

दूचाकी विक्रीतही या महिन्यात २०.२४ टक्क्यांनी फटका बसला असून वर्षाअगोदरच्या तुलनेत ५,४०,५५३ वरून विक्रीत ४,३१,१७१ पर्यंत घट झाली आहे.

नोव्हेंबरमधील एकूण दूचाकी विक्रीत १४.६८ टक्क्यांची घट झाली असून मागिल वर्षातील ६,६५,१८१ संख्येच्या तुलनेत यावर्षी यावर्षी नोव्हेंबरमध्यें फक्त ५,६७,५०२ दूचाकींची विक्री झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चररर्स ने ही आकडेवारी जाहिर केली आहे.